×

History


- २००२

बी.के.सी पोलीस ठाणे

बीकेसी पोलीस ठाणेची ठाणेची इमारत सन २६ डिसेंबर, २००२ सालापासून अस्तित्वात आहे. नमूद इमारत बीकेसी रोड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पुर्व, मुंबई-४०० ०५१ येथे वसलेली आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसर हा पुर्वी खाडीचा भाग होता. एमएमआरडीए ने सदरचा भाग डेव्हलपमेंट करीता ताब्यात घेवुन तेथील खाडी मध्ये भरणी टाकुन तेथे कॉर्पोरेट एरिया (कमर्शियल इंडस्ट्रिज) बनविण्यात येवुन त्यास बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असे नांव देण्यात आले.

सन २००२ मध्ये खेरवाडी पोलीस ठाण्याचे विभाजन होवून बी.के.सी. पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले. बी.के.सी पोलीस ठाण्याचे निर्माण झाल्यानंतर मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ८ यांचे व मा. सहा पोलीस आयुक्त, खेरवाडी विभाग यांचे कार्यालय बी.के.सी. पोलीस ठाण्याचे इमारतीचे पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले.

पूर्व-एम टी एन एल जंक्शन, कुर्ला, पश्चिम-कला नगर जंक्शन, बांद्रा (पुर्व), दक्षिण-मिठी नदी व खाडी, उत्तरे-मुंबई विद्यापिठ, कालीना.