History
- १९२४
भायखळा पोलीस ठाणे
भायखळा पोलीस ठाणेची इमारत सन १९२४ मध्ये बांधण्यात आली आहे. भायखळा पोलीस ठाणे हे मुंबईतील सर्व प्रथम पोलीस ठाणे असून सदरची इमारत ही हेरीटेज इमारत आहे.
भायखळा पोलीस ठाणे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील अति संवेदनशिल व महत्वाचे पोलीस ठाणे म्हणुन गणले जाते. भायखळा पोलीस ठाणे हद्दीतील लोकवस्ती ही मिश्र स्वरूपाची आहे. भायखळा पोलीस ठाणे हद्दीतील लोकसंख्या अंदाजे २५,००,०००/- इतकी असून तिची मुस्लिम ४५ टक्के, हिंदु ४५ टक्के, इतर १० टक्के ( बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारसी ) अशी विभागणी करण्यात आली आहे.
भायखळा पोलीस ठाणेची ४ नियत क्षेत्रामध्ये विभागणी झालेली आहे. सदर पोलीस ठाणेस ३ रेल्वे स्थानक व ६ पोलीस ठाणेची हद्द लागलेली आहे. सदर पोलीस ठाणे अंतर्गत सेवाकर भवन, माझगांव जलाशय, बेस्टचे रिसिव्हींग स्टेशन, सेंट्रल रेल्वेचे सिग्नल/टेलीफोन वर्कशॉप व माझगांव टेलीफोन एक्सचेंज अशी मर्मस्थळे असून जिजामाता उद्यानासारखे प्रेक्षणीय स्थळ व वाहतूक पोलीस प्रशिक्षण केंद्रदेखील आहे.
तसेच भायखळा पोलीस ठाणे हददीत ५ ठिकाणी मोठया प्रमाणात वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहेत. सदर पोलीस ठाणेच्या हद्दीत मिश्र वस्ती असून १९ मंदीरे, १० मस्जिद, ४ दर्गे, ३ बुध्दविहार, ७ जैनमंदीरे ५ चर्च, ३ आग्यारी व १ गुरूव्दारा तसेच ४ कब्रस्तान आहेत. या व्यतिरिक्त खिलाफत हाऊस येथे इद -ए - मिलाद निमीत्त नारळवाडी कब्रस्तान येथे बडीरात, आरामबाग कब्रस्तान व रहमताबाद कब्रस्तान येथे मोहरम निमीत्ताने मोठया प्रमाणात मुस्लीम बांधव एकत्र येतात. तसेच सुमारे १० वर्षापासुन लालबागचा राजा गणपतीचे मुखदर्शन रांगेचे नियोजन भायखळा पोलीस ठाणे करीत आहे. या व्यतिरिक्त अधिवेशन काळात व इतर वेळी राजकीय पक्ष व वेगवेगळया संघटना मोर्चा काढण्याच्या उद्देशाने ‘‘ जिजामाता उद्यान ’’ येथे जमतात. त्यामुळे अशा प्रक्षोभक जमावाचे नियंत्रण करणे हे भायखळा पोलीस ठाणेच्या दृष्टीने आव्हान ठरते.