History
- १९६५
धारावी पोलीस ठाणे
धारावी पोलीस ठाणे परिसर हा पुर्वी माहिम व माटुंगा पोलीस ठाणे यांचे अधिपत्याखाली येत होता. त्यावेळी धारावी परिसरासाठी दुकान क्र.एबीसी-२२३/५, म्युनिसिपल चाळ योजना क्र.५६ धारावी, मेन रोड, धारावी, मुंबई-१७. याठिकाणी एक पोलीस चौकी (आऊट पोस्ट) कार्यन्वीत होती. ती माहिम पोलीस ठाणेच्या अधिपत्याखाली होती. त्यानंतर वाढती गुन्हेगारी/लोकसंख्या/झोपडपट्टी असा माहिम व माटुंगा पोलीस ठाणेच्या हद्दीत विस्तृत परिसर असल्याने नमुद पोलीस ठाणेचे अपूरे मनुष्यबळामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. त्यामुळे धारावी परिक्षेत्रात नवीन पोलीस ठाणेची आवश्यकता भासल्याने, माहिम व माटुंगा पोलीस ठाणेचे विभाजन करुन, परिमंडळ-४ चे अधिपत्याखाली शासन संदर्भ-पीएएस/६३६४/१००४४१९/५, सचिवालय, मुंबई. दिनांक- ३१ मे १९६५ रोजी वर नमुद पोलीस चौकीच्या(आऊट पोस्ट) याठिकाणी दोन खोल्यांची जागा पुरवुन धारावी पोलीस ठाणेची स्थापना होवुन स्वतंत्र कामकाजास सुरुवात झाली.
धारावी पोलीस ठाणेची दि.३१ मे १९६५ रोजी स्थापना झाल्यानंतर काही वर्षांनी धारावी परिसरातील झोपडपट्टी बरोबर लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढल्याने अपु-या जागेमुळे कामकाजास अडचणी निर्माण होवु लागल्याने मुंबई महानगरपालिकेकडुन (९० फुट रोडवर ) पद्मश्री व्हि.के.कृष्णन मार्ग याठिकाणी १५,७६८ चौरस फुट जागा एकुण दोन इमारती (एक मजली) अल्प भाडे तत्वावर पुरविण्यात आली. सदर नवीन जागेवर दिनांक-१५ जुन १९८२ पासुन पोलीस ठाणे कार्यन्वीत झाले.