History
- १९२७
काळाचौकी पोलीस ठाणे
काळाचौकी पोलीस ठाणे हे ब्रिटीश कालीन पोलीस ठाणे असुन मुंबईतील जुन्या पेालीस ठाण्या पैकी एक पेालीस ठाणे आहे. सदर पेालीस ठाणेचे इमारत ही सन १९२७ साली बांधण्यात आली आहे.
काळाचौकी पोलीस ठाणे हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असुन पेालीस ठाणे हददीत सर्व जाती धर्माचे लोक रहावयास आहेत. काळाचैकी पेालीस ठाणेच्या पुर्वेकडील बाजुस कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन आहे. तसेच पुर्वे कडे इंडियन एअर फोर्सचे कार्यालय आहे. तसेच पश्चिम दिशेकडे चिंचपोकळी रेल्वे स्टेशन असुन मुंबई शहरातील प्रसिध्द लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ आहे. तसेच उत्तर दिशेस शिवडी रेल्वे स्टेशन असुन मुंबई पोर्ट ट्रस्टची कामगार वसाहत आहे. तसेच दक्षिण दिशेकडे शिवडी फायरब्रिगेडचे कार्यालय असुन हार्बर मार्गाचे रे रोड स्टेशन आहे.