History
- १९९९
कुरार पोलीस ठाणे
दिंडोशी पोलीस ठाणे व कांदिवली पुर्व पोलीस ठाणे यांचे विभाजन करून शासन क्रमांक एम.आय.एस./१२९८/३८९८/प्र.क्र./पोल-३, दि. २५/०२/१९९९ अन्वये कुरार पोलीस ठाणेची निर्मिती करण्यात आली. सदरचे पोलीस ठाणे दिनांक १४/०२/२००१ रोजी मेसर्स रवि आशिष बिल्डर यांच्या गौरव एम्पायर इमारत, तळमजला, कन्यापाडा, फिल्मसिटी रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई ६३ येथे ना अनामत रक्कम/ना भाडे या तत्वावर दोन वर्षांच्या मुदतीकरीता कार्यान्वीत करण्यात आले होते. नवनिर्मीत कुरार पोलीस ठाणेचे हद्दीत दिंडोशी पोलीस ठाणेच्या क्षेत्रफळा पैकी ९ चौ.कि.मी व कांदिवली पुर्व पोलीस ठाण्याच्या क्षेत्रफळा पैकी ४ चौ.कि.मी क्षेत्रफळ असा एकुण १३ चौ.कि.मी परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे. या नवनिर्मित पोलीस ठाणेच्या हद्दीत ७५ टक्के झोपडपट्टी विभाग आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त मध्यमवर्गीय कष्टकरी जनता रहावयास आहे.
यापुर्वी कार्यरत असलेले कुरार पेालीस ठाणे हे दिंडोशी पोलीस ठाणेच्या हद्दीत होते. त्यामुळे कुरार पोलीस ठाणेच्या हद्दीतील जनतेला अत्यंत गैरसोयीचे होते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूकीची सोय नसल्याने तेथे तक्रार नोंदविण्याकरिता जाणे-येण्यासाठी ऑटो रिक्षाकरिता जास्त पैसे खर्च करावे लागत होते. त्यांना ते फारच त्रासदायक होते. तसेच कुरार पोलीस ठाणे कार्यरत झाल्यापासून ते पोलीस ठाणे हद्दीत असावे अशी जनतेची आग्रहाची मागणी होती. त्याचप्रमाणे पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना आपत्कालीन परिस्थीत पोलीस ठाणे हद्दीत घटना घडलेल्या ठिकाणी पोहचणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न हाताळण्यास गैरसोय निर्माण होत होती. त्याचप्रमाणे सदरहू पोलीस ठाणेची जागा दोन वर्षांचे कालावधीत तिच्या मालकास परत करणे आवश्यक होते. सदर परिसरात पोलीस ठाणे सुरू करणे आवश्यक असल्यामुळे पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शासकिय जागेचा शोध घेतला असता, शांताराम तलाव येथील सिटी सर्वे क्र ८२५ हा एकच भुखंड जनतेच्या सेवेच्या दृष्टीने व पोलीस ठाणेचे कामकाजाचे दृष्टीने सोईस्कर व मध्यवर्ती ठिकाणी असल्याचे आढळून आले.