History
- १९१८
एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाणे
मुंबई पोलीस दलाचे अधिपत्याखाली विविध पोलीस ठाणे, शाखा, विभाग येतात त्यापैकी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे हे दक्षिण मुंबईतील मुंबई पोलीस दलाचे अधिपत्याखालील एक महत्वाचे पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याची स्थापना १९१८ मध्ये झाली असून सन २०१८ मध्ये माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याने १०० वर्षे पूर्ण केले.
माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणेच्या हद्दीत भारताचे आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेले मुंबई शेअर बाजार, रिझर्व बॅंक ऑफ इंडीया, टंकसाळ (मिंट), मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, जनरल पोस्ट ऑफीस, इस्रायल लोकांचे प्रार्थनास्थळ सिनेगॉग (ज्यु मंदीर), सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) रेल्वे स्थानक, प्रमुख कंपन्यांची प्रशासकीय कार्यालये, परदेशी वाणिज्य दूतावास कार्यालये व शाळा यांचा समावेश आहे. विशेषत: या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात भारतीय व परदेशी महत्वाच्या बॅंका आहेत. दक्षिण मुंबईतील घाऊक - किरकोळ विक्रीचे महत्वाचे व गर्दीचे ठिकाण असलेले प्रसिध्द मार्केट म्हणजे मनिष मार्केट व क्रॉफर्ड मार्केट (महात्मा फुले मंडई) हे या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात असून त्या ठिकाणी बर्याच प्रमाणात लोकांची ये जा असते. सुप्रसिध्द असे सेंन्ट जॉर्ज रूग्णालय व त्याअंतर्गत सेंन्ट जॉर्ज शासकीय दंत महाविद्यालय असे महत्वाचे रूग्णालय/महाविद्यालय या पोलीस ठाणेच्या हद्दीत आहेत.