History
- २००८
अंबोली पोलीस ठाणे
अंबोली पोलीस ठाणे हे पूर्वीच्या ओशिवरा पोलीस ठाणे परिसिमेचे विभाजन करुन महाराष्ट्र शासन आदेश क्रं.पीओएस- ३१०८/१८३/प्र.क्रं. ५०/पोल-३, मंत्रालय, मुंबई दि. २८/०३/२००८ अन्वये दिनांक १०/१०/२००८ पासून कार्यन्वीत करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत अंबोली पोलीस ठाणेच्या अखत्यारित अंदाजे ४,००,००० इतक्या लोकसंख्येचा परिसर येत असून, तो एकूण तीन बिट परिक्षेत्रामध्ये विभाजीत करण्यात आलेला आहे. एकूण ३.७५ चौ.कि.मी. इतक्या क्षेत्रफळाचा परिसर पोलीस ठाणे परिसिमेकरीता निश्चित करण्यात आलेला आहे.
अंबोली पोलीस ठाण्याची इमारत ही ओशिवरा पोलीस ठाणेच्या हद्यीत बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या अॅमिनीटी प्लॉटवर बांधण्यात आलेली आहे. जागेचे क्षेत्रफळ ४००० चौ. फुट आहे.
दिनांक १०/१०/२००८ पासून पोलीस ठाणे कार्यान्वित झाले.