History
- १९८२
अँन्टॅाप हिल पोलीस ठाणे
अँन्टॅाप हिल पोलीस ठाणेची स्थापना झाली त्यावेळी हद्दीमध्ये मुख्यत्त्वे गुरु तेग बगदूर नगर, प्रतिक्षा नगर, सी. जी. एस. कॉलनी हा परिसर होता. तसेच तिन्ही बाजूने दलदल होती. सदर विभागात मुख्यत्वे सरकारी कर्मचारी यांची वसाहत आणि शिख व हिंदू धर्मिय लोक रहात होते. परंतू नंतर दलदलीवर हळूहळू अतिक्रमणे होऊन अनधिकृत झोपड्या वाढल्या. त्यावेळी सरकारी जागेत अतिक्रमण करण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे त्या भागात शारिरीक गुन्हे जास्त प्रमाणात होत असल्याने अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक १३९६/१९८२ प्रशासन शाखा क्रमांक १, दिनांक २९/११/१९८२ अन्वये दिनांक १/१२/१९८२ पासून अॅन्टॉप हिल सब पोलीस ठाणे म्हणून सुरु करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासन, गृह विभाग निर्णय क्रमांक पीओएस/२६८०/१३७०९/पोल-३, मंत्रालय, मुंबई, दिनांक २४/०५/१९८४ पासून पूर्ण दर्जा पोलीस ठाणे कार्यान्वित झाले.
अँन्टॅाप हिल पोलीस ठाणेच्या अधिकार क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे ६,५०,००० आहे.
पोलीस स्टेशन स्थापना वर्ष -१९८२