×

History


- २००१

शाहुनगर पोलीस ठाणे

धारावी पोलीस ठाणे हे टी एच कटारीया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, शाहुनगर कॉलनी, या परिसरात राहणाऱ्या लोकांना लांबचे व दळणवळणास सोयीचे नसल्याने त्यानी विभागातील आमदार व खासदार याच्यामार्फत स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी शासनाकडे केली. त्यावेळी दि. ०१/०४/२००१ पासून शाहुनगर कॉलनीतील म्युनिसीपल वेल्फेअर सेंटरची जागा तात्पुरत्या स्वरूपात मुंबई महानगर पालिकेकडून घेण्यात आली व मा. गृहराज्य मंत्री श्री. कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले व सदर पोलीस ठाण्याचे शाहुनगर पोलीस ठाणे असे नामकरण करण्यात आले. सदर उद्घाटन सोहळयास मा. आरेाग्य राज्यमंत्री श्री. एकनाथराव गायकवाड, मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. एम. एन. सिंग व इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते.

शाहुनगर पोलीस ठाणेच्या पुर्वेस सायन पोलीस ठाणेची हद्द, पश्चिमेस माहिम पोलीस ठाणे, दक्षिणेस शिवाजी पार्क, दादर पोलीस ठाणे हद्द, व उत्तरेस धारावी पोलीस ठाणेची हद्द आहे.

शाहुनगर पोलीस ठाणेची हद्दही तीन बिटमध्ये विभागण्यात आली असून अशा नियत क्षेत्रात पोलीस ठाण्याचा कारभार चालु आहे.