History
- १९९७
शीव पोलीस ठाणे
बृहन्मुंबई शहरातील माटुंगा व शीव हे विभाग मुंबई शहरातील महत्वाची ठिकाणे असुन दोन्ही विभागाचे कार्यक्षेत्र साधारण ६ चौ.कि.मी. आहे. सदरचे दोन्ही विभाग हे माटुंगा पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात येत होते. सदर विभागातील वाढती लोकसंख्या तसेच या परिसरात घडणाऱ्या गुन्हयांचे प्रमाण अधिक असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कामकाज सुरळीत व्हावे याचा विचार करून तसेच गुन्हेगारी प्रमाण नियंत्रित राहावे, याकरीता महाराष्ट्र शासनाने खालील आदेशान्वये माटुंगा पोलीस ठाणेचे विभाजन करून नविन शीव पोलीस ठाणेची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्र शासननिर्णय क्र.अपोआ/३१९६/२५०९/प्र.क्र.-१२/पोल-३, मंत्रालय, मुंबई-३, दि.०७ सप्टेंबर १९९६ अन्वये माटुंगा पोलीस ठाण्याची विभाजन करून शीव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. उपरोक्त शासन आदेशान्वये माटुंगा पोलीस ठाणेचे आवारातील दक्षिण बाजुस असलेल्या अधिकारी निवासस्थान, तळमजला या ठिकाणी दि. २८/०२/१९९७ रोजीपासुन सुरू करण्यात आलेले आहे.