History
- २००७
वनराई पोलीस ठाणे
वनराई पोलीस ठाणे हे दि.१९/०६/२००७ रोजी स्थापन करण्यात आलेले आहे. पोलीस ठाण्याचे एकूण ३ बिट चौकी आहेत. पोलीस ठाणे क्षेत्रफळ ०६ चौरस किमी असून लोकसंख्या ३,७०,००० आहे. वनराई पोलीस ठाणे हे दिंडोशी विभाग व परिमंडळ १२ कार्यालयाच्या अखत्यारीत येत
पोलीस ठाण्याचे कामकाज सुरळीत चालण्याकरीता पासपोर्ट विभाग, बारनिशी विभाग, सायबर सेल, पोक्सो सेल व डिटेक्शन असे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
वनराई पोलीस ठाण्याचे स्थळ सिमेस लागुन, पूर्वेस आरे पोलीस ठाणे, पश्चिमेस गोरेगांव पोलीस ठाणे, उत्तरेस दिंडोशी पोलीस ठाणे व दक्षिणेस जोगेश्वरी पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम दृतगती महामार्ग आहे. पोलीस हद्दीत गोरेगाव तसेच राममंदिर रेल्वे स्थानक, नेस्को प्रदर्शन केंद्र, रिलायन्स एनर्जी कार्यालय, महानंदा दूध डेयरी व हब मॉल हे महत्वाची ठिकाणे आहेत.