×

History


- १६७२

मुंबई : प्रारंभी

गव्हर्नर गॅराल्ड ऑंगियर (१६७२-१६७७) यांच्या मते व्यापारी फायद्यांमुळे आणि नैसर्गिक बंदर असल्यामुळे मुंबई हे सूरतपेक्षा ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होण्यासाठी एक चांगले ठिकाण होते. हे हस्तांतरण सन १६८६ मध्ये केले गेले.

ऑंगियर यांची समजूत होती की मुंबई शहर हे देवाच्या सहाय्याने उभारणे संकल्पित होते आणि त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. शहराची तटबंदी मजबूत करण्यात आली, किल्ल्यांच्या सभोवताली खंदक खोदण्यात आले, किल्ल्यांवर नवीन बुरुज बांधण्यात आले आणि त्यावरील तोफखाना वाढवण्यात आला, एक आरमारी तळ स्थापन करण्यात आला, बंदरे वाढविण्यात आली, सैनिकी शिबंदी (गॅरीसन) वाढविण्यात आली, सायन आणि शिवडी या किल्ल्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आणि सन १७७० मध्ये सेंट जॉर्ज हा नवीन किल्ला बांधण्यात आले.

इंग्रजी कायदे आणि न्यायालये स्थापन करण्यात आले आणि न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली, जहाज बांधणीकरिता भागभांडवल उभारण्यात आले, टांकसाळ स्थापित करण्यात आले आणि एक रुपयाचे नाणे पहिल्यांदा बनवले गेले.     ऑंगियर यांनी मेंडहॅम पॉईन्ट येथे दगडी ईमारत बांधण्याची शिफारस केली, जिथे सध्या महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांचे कार्यालय आहे.

१८४९ मध्ये तत्कालीन बॉम्बे सरकारनेज आयोजीत केलेली  प्रथम जनगणनेची कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांचे महत्त्वपूर्ण काम केले. पोलीस अधीक्षक कॅप्टन ई. बेनेस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

- १९४०

वांद्रे पोलीस ठाणे

बांद्रा पोलीस ठाणे हे बृहन्मुंबईतील सर्वात जुन्या पोलीस ठाण्यांपैकी एक आहे. बांद्रा पोलीस ठाणेची स्थापना सन १९४० ला झाली. पोलीस ठाण्याची इमारत ही ५८, हिल रोड, रामदास नायक मार्ग, वांद्रे पाश्चिम मुंबई-४०००५० येथे वसलेली आहे.

पोलीस ठाण्याच्या जागेचे क्षेत्रफळ १३८८ चौ. मी. आहे. पोलीस ठाणे इमारतीमागे बांद्रा जनरल लॉकअप आहे. जनरल लॉकअप मध्ये वाकोला, निर्मल नगर, खेरवाडी, बी.के.सी., खार, गुन्हे शाखा, युनिट-९, सायबर पोलीस ठाणे व वांद्रे पोलीस ठाणे येथील नोंद गुन्हयातील अटक आरोपीतांना ठेवले जाते.

पुर्व दिशा -वांद्रे रेल्वे स्टेशन परिसर, पश्चिम दिशा - वांद्रे बॅन्डस्टॅन्ड, चिंबई गाव व कार्टर रोड समुद्रकिना-या पर्यर्ंत दक्षिण दिशा - माहिम कॉजवे खाडी वरील ब्रिज, वांद्रे वरळी सागरी मार्ग.उत्तर दिशा -निलगीरी गार्डन, लिंक रोड परिसर,